Wednesday, February 21, 2024

१९९३ -१९९४ सातवी


        १९९३ -१९९४ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता सातवीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर चा कार्यक्रम यावर्षी श्री भैरवनाथ विद्यालय दोंदे या ठिकाणी पार पडला. या सर्व मित्रांनी बऱ्याच वर्षानंतर आपल्या सातवीच्या वर्ग मित्रांना शुभेच्छा दिल्या, भेट झाली, चर्चा केली व सुख दुःखाबद्दल आपुलकीने विचारपूस केली. छान प्रकारे सुग्रास जेवण घेतल्यानंतर त्यांनी एक अतिशय छान निर्णय घेतला की ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोंदे व श्री भैरवनाथ विद्यालय दोंदे या शाळांमध्ये त्यांनी बालपणीच व तरुणपणीचे शिक्षण पूर्ण केलं या दोन्ही संस्थांना आपल्याकडून जी रक्कम कार्यक्रम करून उरली होती ती रक्कम दोन्ही संस्थाना पंधरा पंधरा हजार रुपये भेट दिली. याच माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोंदी या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या वतीने बोरवेल घेण्यासाठी रोख रुपये 15000 रुपये देण्यात आले शाळेची मुख्याध्यापकश्री.तानाजी गुनाजी आंबेकर , शिक्षक स्टाफ व शाळा व्यवस्थापन समिती दोंदे यांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे व सुजन नागरिकांचे शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार.

No comments:

Post a Comment

१९९३ -१९९४ सातवी

          १९९३ -१९९४ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता सातवीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर चा कार्यक्रम यावर्षी श्री भैरवनाथ विद्य...